nrusinhadevasthan@gmail.com
Follow us:

क्षेत्राचा धावता इतिहास

  • इ.स. पूर्व ५५६१ - महाभारत पुर्वकाळ वेद व्यास पिता पराशर ऋषींना दर्शन दिलेली तीच मूर्ती प्रत्यक्ष भुयारात आहे.
  • इ.स. १७५ - राजा भीमदेव, कौडिण्यपूर(कुंडल) यांचेकडून नृसिंह मूर्ती शोध व स्थापना.
  • इ.स. ११२४ - संत शिरोमणी नामदेव महाराजांचे ६वे पूर्वज यदुशेठ, रिळे गावातून देवाच्या सेवेसाठी आले होते. ३,४ पिढ्या इथे राहिले.
  • इ.स. १२७३ - रामदेवराव यादव, देवगिरी यांनी हेमाद्री पंताकडून मंदिराचे भुयारीमार्ग बांधकाम केले.
  • इ.स. १४२६ - विजापूरचा बादशाह महम्मद आदिलशाह यांनी मागे चालत आलेप्रमाणे श्री नृसिंहास जमीन इनाम दिली त्यावेळेपासून पुजाऱ्यांच्या १७ पिढ्या.
  • इ.स. १४४९ - श्री गुरुचरित्र, अध्याय १५ , ओवी ७५ मध्ये या क्षेत्राचा उल्लेख आहे.
  • इ.स. १६६२ - श्री समर्थ रामदास स्वामी यांनी २,३ वेळा इथे श्रींचे दर्शनासाठी येऊन आरती रचना केली.
  • इ.स. १७१८ - सातारचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी अग्रहार जमीन इनाम दिली.
  • इ.स. १७७८ - श्री सिद्धेश्वर बुवा महाराज, कोल्हापूर संस्थानचे राजगुरू यांनी पुजारी मंडळीवर होण्यारा अन्यायाबाबत दावा नाना फडणीस, पुणे यांचेकडून विजयी केला